1 comment:

UPADHYE GURUJI said...

श्रीदत्तक्षेत्र नारायणपूर
मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला सायंकाळी येथे दत्तजन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो, दत्तजन्म पाळणा हलवून दिगंबरा... दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा...च्या गजरात होतो. रात्री शोभेचे दारूकाम आणि दत्त्जान्माचे कीर्तन असे विविध कार्यक्रम होतात. दुस-या दिवशी सकाळी उत्सव मूर्तींना आणि दत्तमहाराजांच्या पादुकांना अभिषेक घालून पालखीमधून ग्रामप्रदक्षिणेसाठी सवाद्य मिरवणूक काढून नेले जाते. ग्रमप्रदक्षिणा चालू असताना गावामधील चंद्रभागा कुंडामध्ये उत्सव मूर्ती व गुरुपादुकांना स्नान घातले जाते. या मिरवणुकीमध्ये हत्ती घोडे उंट असा सर्व काही लवाजमा असतो दत्तभक्तांचा हा सोहळा पाहण्यसाठी महापूर लोटला जातो.
श्रीक्षेत्र नारायणपूर, जेजुरी आणि श्रीखंडोबाविषयी माहितीसाठी लॉग इन करा
www.jejuri.in/around_jejuri#narayanpur
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...